-
*उभा दगड व जयनगर येथील आदिवासी वस्ती सुधार योजनेतील कामांबाबत तक्रारींची चौकशी सुरू……..!*
नंदुरबार प्रतिनिधी – शहादा तालुक्यातील उभा दगड व जयनगर येथील आदिवासी वस्ती सुधार योजने अंतर्गत सुरू असलेल्या मंजूर विकास कामांबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींची एकात्मिक आदिवासी प्रकल्प नंदुरबार यांच्याकडून दखल घेण्यात आली असून चौकशी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
सन २०२२ – २३ या आर्थिक वर्षात आदिवासी वस्ती सुधार योजने अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या पेव्हर ब्लॉक व रस्ता काॅंक्रीटीकरण कामांच्या अंमलबजावणी बाबत ग्रामस्थांनी तक्रारी अर्ज दाखल केला होता.आदिवासी विकास विभागाने संबंधित प्रकरणाची प्रशासकीय दखल घेतली आहे.
तक्रारीच्या चौकशीसाठी आदिवासी विकास निरीक्षकांमार्फत प्रत्यक्ष स्थळ फोटो पाहणी करण्यात आली असून सदर पाहणी अहवाल संबंधित कार्यालयास सादर करण्यात आला आहे.पाहणी दरम्यान कामांच्या प्रत्यक्ष स्थितीचे छायाचित्रे व कागदपत्रांची तपासणी करण्यात आल्याचे नमूद केले आहे.
याप्रकरणी जिल्हा परिषद बांधकाम विभागास आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून पुढील निर्णय चौकशी अहवालाच्या आधारे घेण्यात येणार आहे.अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दरम्यान आदिवासी विकास योजनेतील कामे दर्जेदार व पारदर्शक पध्दतीने व्हावीत.अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.तसेच याप्रकरणी दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
*उभा दगड व जयनगर येथील आदिवासी वस्ती सुधार योजनेतील कामांबाबत तक्रारींची चौकशी सुरू……..!*
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
*भारतीय जनता पार्टी तर्फे एरंडोल पोलीस स्टेशनला निवेदन*
June 22, 2026
7:40 pm
*एरंडोल येथे ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार……….!*
June 21, 2026
8:26 am
*आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एरंडोल येथे सामूहिक योगाभ्यास कार्यक्रम*
June 20, 2026
1:27 pm
*कवी मनोहर आंधळे यांच्या कवितेचा इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकात समावेश.*
June 13, 2026
3:21 pm
