Home » शैक्षणिक » *ॲड. रेणुका जाधव यांचे वकिली क्षेत्रात यशस्वी पदार्पण,सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार…………!*

*ॲड. रेणुका जाधव यांचे वकिली क्षेत्रात यशस्वी पदार्पण,सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार…………!*

  1. *ॲड. रेणुका जाधव यांचे वकिली क्षेत्रात यशस्वी पदार्पण,सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार…………!*


    ​एरंडोल प्रतिनिधी – येथील न्यायालयीन क्षेत्रात दीर्घकाळापासून कार्यरत असलेले कोर्ट कर्मचारी श्री. गोपाल माणिक जाधव यांच्या सुकन्या कु. रेणुका गोपाल जाधव यांनी विधी (कायदा) शाखेचे शिक्षण पूर्ण करून वकिली व्यवसायात अधिकृतपणे यशस्वी पदार्पण केले आहे. त्यांच्या या यशामुळे एरंडोल परिसरासह वकील वर्ग आणि नातेवाईकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
    ​घरातील न्यायालयीन वातावरण आणि कायद्याची आवड यामुळे रेणुका यांनी हे क्षेत्र निवडले. पाच वर्षांचा कठोर परिश्रम, चिकाटी आणि वडिलांसह एरंडोल येथील आदरणीय न्यायाधीशांचे लाभलेले मार्गदर्शन यांच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले.
    ​”न्याय, सत्य आणि सामाजिक बांधिलकी जपत समाजातील सर्वसामान्य व वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन,” असा दृढ निर्धार ॲड. रेणुका जाधव यांनी यावेळी व्यक्त केला.
    ​त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे डीन डॉ. युवाकुमार रेड्डी, डॉ. योगेश महाजन, नाभिक समाजाचे अध्यक्ष रामभाऊ गांगुडे यांच्यासह विधी, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या