- *एरंडोल येथे भाविकांनी घेतले राई विठ्ठल रूक्मिणीचे दर्शन………!*
एरंडोल – येथे श्री विठ्ठल वाडी मंदिर संस्थान हे मंदिर सुमारे ४०० वर्षांपूर्वीचे पुरातन असून येथे अमळनेर येथील सखाराम महाराजांचे गुरु गादी रावसाहेब महाराज यांचे वास्तव्य राहिले आहे.या मंदिरात राई विठ्ठल रूक्मिणी अशा तीन मुर्त्या विराजमान आहेत.आषाढी एकादशी निमित्त या मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली.
भाविकांना सुलभ दर्शन व्हावे म्हणून सामाजिक कार्यकर्ते जगदीश ठाकूर, पुजारी राजु भागवत व इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.ब्राह्मण ओटा विठ्ठल मंदिर व बुधवार दरवाजा परिसरातील विठ्ठल मंदिर या दोन्ही ठिकाणी दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी दिसून आली.
*एरंडोल येथे भाविकांनी घेतले राई विठ्ठल रूक्मिणीचे दर्शन………!*
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
स्वातंत्र्य सेनानी शहादू चौधरींना आडगावात श्रद्धांजली
May 24, 2026
6:14 pm
*प्रमोद महाजन यांची भाजपात युवा मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती………….!*
May 16, 2026
9:12 pm
