एरंडोल प्रतिनिधी -येथील अमळनेर नाका परिसरात जुन्या कासोदा रस्त्यालगत खुल्या भुखंडावर १० ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शिंपी समाज मंदिराच्या भुमीपुजनाला परिसरातील रहिवाशांकडून प्रखर विरोध करण्यात आल्यामुळे भुमीपुजन न होता उभारलेला मंडप,खुर्च्या व इतर साहित्य काढून नेण्यात आले.शिंपी समाज बांधवांनी विरोध करणाऱ्या रहिवाशांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांना यश मिळाले नाही.उंबरठ्यावर असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी ही घटना घडल्यामुळे विरोधकांना टिकेची झोड उठवण्यासाठी आयते भांडवल उपलब्ध होणार आहे.
आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते एरंडोल येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व विकासकामांचे लोकार्पण १० ऑक्टोबर व ११ ऑक्टोबर २०२४ रोजी करण्याचे नियोजन करण्यात आले.या सोहळ्याप्रसंगी जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.पहिल्या दिवशी काही विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण उत्साहात करण्यात आले.जुन्या कासोदा रस्त्यालगत शिंपी समाज सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन करण्यासाठी शिंपी समाजाचे काही कार्यकर्ते सकाळी ११ वाजेच्या सुमारास खुल्या भुखंडावर जाऊन साफसफाई करून भुमीपजनाचा बॅनर लावला असता परिसरातील महिलांनी त्यांना विरोध केला.विरोध पाहता बॅनर काढून नेले.सायंकाळी ४ वाजेनंतर भुमीपुजनासाठी मंडप उभारून कार्यक्रमाची तयारी करण्यात आली.कार्यक्रमासाठी शिंपी समाज बांधव एकत्र जमले असता परिसरातील नागरिक व महिलांनी कार्यक्रमस्थळी धाव घेतली व भुमीपुजनाच्या कामास विरोध दर्शवण्यात आला.संतप्त रहिवाशांनी आमच्या मुलभूत सोयी सुविधांकडे दुर्लक्ष केले जाते व आमच्या हक्काच्या खुल्या भुखंडावर आमची परवानगी नसताना भुमीपुजन कसे करतात? असा जाब विचारला.त्यावर शिंपी समाज बांधवांनी संतप्त रहिवाशांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांना प्रतिसाद मिळाला नाही.शेवटी भुमीपुजन भुखंडावर न होता निमंत्रण पत्रिकेवर राहिले.एरंडोल बदलतं आहे असे निमंत्रण पत्रिकेच्या मुखपृष्ठावरील मजकूर पाहता खरोखर अशा पध्दतीने बदलले की काय? अशी चर्चा जनमानसातून होत आहे.
एरंडोल येथे शिंपी समाज मंदिराच्या जागेच्या भुमीपुजनास परिसरातील नागरिकांचा प्रखर विरोध…!
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
*भारतीय जनता पार्टी तर्फे एरंडोल पोलीस स्टेशनला निवेदन*
June 22, 2026
7:40 pm
*एरंडोल येथे ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार……….!*
June 21, 2026
8:26 am
*आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एरंडोल येथे सामूहिक योगाभ्यास कार्यक्रम*
June 20, 2026
1:27 pm
