- *जवखेडेसिम येथे आमदार अमोलदादा यांच्या हस्ते* *शिवस्मारकासह विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण*
एरंडोल प्रतिनिधी – दिनांक 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर आमदार अमोल चिमणराव पाटील यांच्या हस्ते जवखेडे सिम येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले त्यात प्रामुख्याने ग्रामपंचायत कार्यालय यांचे लोकार्पण तर अभ्यासिका व सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन करण्यात आले
यावेळी बोलताना आमदार अमोल दादा पाटील यांनी जवखेडेसिम हे गाव कायम आबासाहेब व माझ्या मागे भक्कम पणे उभे राहिले ज्या प्रमाणे तुम्ही प्रेम केले त्या प्रमाणेच आम्ही देखील गावावर कायमच प्रेम करतो म्हणून भविष्यात विकासकामा साठी कोणताही निधी देखील कमी पडू देणार नाही अशी ग्वाही देत अमोल दादा यांनी सदर विकासकामे व शिवस्मारक बाबत शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील यांच्या सह गावाचे विशेष कौतुक केले कार्यक्रमाला श्रेष्ठ नागरिकांसह माता भागिनी व तरुण मित्रांची उपस्थिती पाहून मनाला खूप आनंद झाल्याचे देखील त्यांनी सांगितले
आपल्या प्रास्ताविकात शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील यांनी अमोल दादा पाटील यांचे आभार मानत तुमच्या मुळेच गावाचे रूप पालट झाल्याचे सांगत भविष्यात आपल्या कडून गावाला अशी भक्कम साथ कायम मिळत राहो अशी आशा व्यक्त केली
यावेळी आमदार अमोल दादा पाटील यांच्या सोबत शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख सुदाम तात्या राक्षे, तालुकाप्रमुख रवी जाधव, मा. सभापती अनिल महाजन, दादाजी पाटील, दिलीप रोकडे सर, गबाजी अण्णा पाटील माजी तालुकाप्रमुख बबलू दादा पाटील, माजी संचालक गजानन पाटील ,युवा सेना विधानसभा क्षेत्र प्रमुख ज्ञानेश्वर कंखरे,युवा सेना तालुकाप्रमुख कमलेश पाटील, एरंडोल नगरपालिका माजी उपनगराध्यक्ष कुणाल महाजन, नगरसेवक अनिल महाजन,अतुल महाजन,शिवसेना उपतालुका प्रमुख राजेंद्र पाटील, शेतकी संघ संचालक पिंटूआबा पाटील, भातखेडा सरपंच मनोहर पाटील,माजी सरपंच ज्ञानेश्वर बडगुजर,उपसरपंच शिवाजी पाटील,पोलिस पाटील श्यामकांत पाटील, निपाणे माजी सरपंच श्रीधर पाटील, उपसरपंच शरद ठाकूर, ताडे येथील माजी सरपंच शांताराम पाटील, माजी सरपंच सचिन पाटील, विश्वास पाटील, खेडगाव सरपंच निंबा पवार,माजी युवा सेना तालुका संघटक गोविंदा राठोड , उपतालुका प्रमुख बाळासाहेब पाटील, वनकोठे उप सरपंच विठ्ठल पाटील,युवासेना उपतालुका प्रमुख जगदीश पाटील, नागदुली अजय पाटील, खडके उपसरपंच धना पाटील,सुकलाल पाटील आडगाव, धीरज पाटील आनंदनगर,माजी सरपंच गजानन राठोड,आत्माराम राठोड,यशवंत पाटील, फरकांडे शरद पाठक, रवीजोगी ,महेंद्र पाटील, मनोज महाजन,जोगेंद्र चौधरी, सुनील चौधरी,कुणाल पाटील, आदित्य पाटील यांचे सह जवखेडे सिम सरपंच उपसरपंच विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक व ग्रामस्थ उपस्थित होते प्रास्तविक शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील यांनी केले तर आभार माजी सरपंच दिनेश बापू आमले यांनी मानले
*जवखेडेसिम येथे आमदार अमोलदादा यांच्या हस्ते* *शिवस्मारकासह विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण*
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
*भारतीय जनता पार्टी तर्फे एरंडोल पोलीस स्टेशनला निवेदन*
June 22, 2026
7:40 pm
*एरंडोल येथे ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार……….!*
June 21, 2026
8:26 am
*आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एरंडोल येथे सामूहिक योगाभ्यास कार्यक्रम*
June 20, 2026
1:27 pm
