Home » सरकारी » *लोकशाहीचा जागर तळागाळापर्यंत!’ एरंडोलमध्ये विशेष मतदार नोंदणी मोहिमेला अभूतपूर्व प्रतिसाद……..!*

*लोकशाहीचा जागर तळागाळापर्यंत!’ एरंडोलमध्ये विशेष मतदार नोंदणी मोहिमेला अभूतपूर्व प्रतिसाद……..!*

  1. *लोकशाहीचा जागर तळागाळापर्यंत!’ एरंडोलमध्ये विशेष मतदार नोंदणी मोहिमेला अभूतपूर्व प्रतिसाद……..!*

     

    ​एरंडोल (प्रतिनिधी)
    महसूल व निवडणूक प्रशासनाच्या ‘विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेला’ एरंडोल परिसर व ग्रामीण भागात, विशेषतः आदिवासी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रशासनाचे अचूक नियोजन आणि बीएलओं च्या प्रयत्नांमुळे ही मोहीम यशस्वी ठरली.
    विशेष म्हणजे दुर्गम व वंचित घटकांपर्यंत पोहोचून मतदार नोंदणी, नाव-पत्ता दुरुस्ती, फोटो अद्ययावतीकरण आणि स्थलांतरितांची नोंद करण्यात आली. धरणगाव रस्त्यावरील आदिवासी बांधवांसाठी बी एल ओ क्र. ३८ व ४० द्वारे स्थानिक पातळीवर नोंदणीची सोय करण्यात आली.
    ​ प्रांताधिकारी मनीष कुमार गायकवाड, तहसीलदार गोपाळ पाटील, मुख्याधिकारी अमोल बागुल व नायब तहसीलदार किशोर माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने विशेष परिश्रम घेतले.
    ​प्रशासनाने सर्व नागरिक व कर्मचाऱ्यांचे आभार मानत मतदार यादी अचूक ठेवण्यासाठी भविष्यातही अशाच सहकार्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या

एरंडोलच्या प्रशासकीय सुविधांच्या बळकटीकरणाकडे आणखी एक महत्त्वाचे पाऊल! एरंडोल दुय्यम निबंधक श्रेणी-१ कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे २ कोटी ८६ लाखांच्या खर्चातून लोकार्पण; आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते उद्घाटन…

*जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील,माजी आमदार चिमणराव पाटील व विद्यमान आमदार ॲड अमोल पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे एरंडोल येथे आदिवासी विकास उपविभागीय कार्यालयास मान्यता ………….!* *एरंडोल,पारोळा मतदारसंघातील अनुसूचित जमातीच्या नागरिकांना होणार स्थानिक पातळीवर शासकीय सेवायोजनांचा लाभ………..!*