Home » सरकारी » *उत्राण येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरात विविध शासकीय योजनांचा लाभ………..!*

*उत्राण येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरात विविध शासकीय योजनांचा लाभ………..!*

  1. *उत्राण येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरात विविध शासकीय योजनांचा लाभ………..!*


    एरंडोल प्रतिनिधी – तालुक्यातील उत्राण येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे १७ एप्रिल २०२६ रोजी आयोजन करण्यात आले.या शिबिराचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी मंजुषा घाडगे यांनी केले.यावेळी तहसीलदार गोपाळ पाटील, विविध प्रशासकीय विभागांचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध तालुकास्तरीय शासकीय अधिकारी, मान्यवर व लाभार्थी उपस्थित होते.या शिबिरात पुरवठा शाखा -३२ अन्न सुरक्षा लाभ, नवीन व दुबार शिधापत्रिका,संजय गांधी योजने अंतर्गत २१ लाभार्थ्यांची डि बी टी व डि एल सी ( हयात प्रमाणपत्र ) प्रक्रिया पूर्ण,४७ हयात प्रमाणपत्रे,५ नवीन अर्ज, सेतू शाखा ५७ उत्पन्न,५२ राष्ट्रीयत्व,४१ रहिवासी,२५ जातीचे दाखले वाटप,२५ आधार नोंदणी, पंचायत समिती,२ जलतारा योजनेला प्रशासकीय मान्यता, बालविकास विभाग २ लाभार्थ्यांना बेबी किट वाटप, तालुका आरोग्य विभाग जननी सुरक्षा योजना ४ लाभार्थ्यांना लाभ वाटप, प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या २ लाभार्थ्यांना लाभ वाटप, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या ३ लाभार्थ्यांना लाभ, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या ७ लाभार्थ्यांना लाभ, कृषी विभाग फळबाग लागवड योजनेच्या ४ लाभार्थी तसेच महा डी बी टी द्वारे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व यंत्रांचे वाटप करण्यात आले.
    याशिवाय गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेच्या २ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.शिबिराच्या ठिकाणी विविध प्रशासकीय विभागांचे माहितीपर प्रदर्शनीय टेबल लावण्यात आले होते.यावेळी जवळपास ९०० नागरिकांनी हजेरी लावली असून त्यांना शासकीय सेवेचा थेट गावपातळीवर लाभ देण्यात आला.
    प्रास्ताविक तहसीलदार गोपाळ पाटील यांनी केले.नोडल अधिकारी संजय घुले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.नायब तहसीलदार अमोल बन यांनी आभारप्रदर्शन केले.नायब तहसीलदार किशोर माळी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक, पोलीस पाटील, सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या