Home » सरकारी » *एरंडोल नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष पदी कृष्णा प्रल्हाद ओतारी यांची बिनविरोध निवड, अल्पसंख्यांक व सर्वसामान्य कुटुंबातील होतकरू युवकाला संधी…………..!*

*एरंडोल नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष पदी कृष्णा प्रल्हाद ओतारी यांची बिनविरोध निवड, अल्पसंख्यांक व सर्वसामान्य कुटुंबातील होतकरू युवकाला संधी…………..!*

  1. *एरंडोल नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष पदी कृष्णा प्रल्हाद ओतारी यांची बिनविरोध निवड, अल्पसंख्यांक व सर्वसामान्य कुटुंबातील होतकरू युवकाला संधी…………..!*

    नगराध्यक्ष सत्कार करतांना

    सोबत तहसीलदार गोपाळ पाटील, मुख्याधिकारी अमोल बागुल

    एरंडोल प्रतिनिधी – येथील नगरपरिषदेची विशेष सभा १ जुलै २०२६ रोजी नगरपालिका सभागृहात आयोजित करण्यात येऊन यावेळी कृष्णा प्रल्हाद ओतारी या अल्पसंख्याक समाजातील युवकाची उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली.विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार गोपाळ पाटील हे होते.तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ.नरेंद्र ठाकूर व मुख्याधिकारी अमोल बागुल व नगरसेवक उपस्थित होते.
    कृष्णा ओतारी यांची नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे घोषित झाल्यावर सभागृहात एकच जल्लोष करण्यात आला.तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कृष्णा ओतारी यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.या विशेष सभेला २५ नगरसेवकांपैकी २१ नगरसेवकांची उपस्थिती होती.उपस्थित नगरसेवकांमध्ये शिवसेना गटनेते प्रा. मनोज पाटील, अनिल महाजन, डॉ.गितांजली ठाकूर, रविंद्र महाजन, शारदा मराठे, कमलबाई पाटील, आरती महाजन,इम्रान अली पठाण, नरेंद्र पाटील, अमोल तंबोली, पौर्णिमा देवरे, सुनिता माळी, प्रशांत महाजन, सत्यभामाबाई पाटील, भारती गुजर, नितेश चौधरी,मनकरनाबाई चौधरी, पठाण नय्यमखां कागजी,,नजमाबी सय्यद आदी उपस्थित होते.
    निवडणूक प्रक्रियेसाठी कार्यालय अधीक्षक एस.आर.ठाकूर, प्रशासकीय हितेश जोगी,आर.के.पाटील,सभा लिपिक महेंद्र पाटील, लक्ष्मण पाटील यांनी परिश्रम घेतले.
    कृष्णा ओतारी यांचा मित्रपरिवार, हितचिंतक व नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करून नगरपालिका कार्यालयापासून कृष्णा ओतारी यांच्या घरापर्यंत सवाद्य मिरवणूक काढली व जल्लोष केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
संबंधित बातम्या