Home » शैक्षणिक » *क. ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एम. ए.प्रथम वर्ष अभ्यासक्रमासाठी प्रा. वा. ना. आंधळे यांची कविता*

*क. ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एम. ए.प्रथम वर्ष अभ्यासक्रमासाठी प्रा. वा. ना. आंधळे यांची कविता*

  1. .
    *क. ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एम. ए.प्रथम वर्ष अभ्यासक्रमासाठी प्रा. वा. ना. आंधळे यांची कविता*


  2. एरंडोल – येथील सुप्रसिद्ध कवी प्रा. वा. ना. आंधळे यांची “आई, मला जन्म घेऊ दे” या कवितेचा समावेश कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्राच्या पदव्युत्तर एम. ए. मराठी (MAR 412) या क्रमांकाच्या ‘साहित्य समीक्षा : सिद्धांत आणि उपयोजन’ या अभ्यास पत्रिकेत करण्यात आला असून विद्यापीठाचे या संदर्भातील पत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले आहे.
    या कवितेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आस्वादक समीक्षा पद्धती अभ्यासता येईल.अभ्यास मंडळाच्या या उद्दिष्टाचा कवी आंधळे यांनी सहर्ष आनंद व्यक्त केलाय. सदर ‘आई! मला जन्म घेऊ दे!’ या स्त्रीभ्रूण हत्येच्या विरोधातील भावकवितेला प्रचंड जनाधार लाभला असून या कवितेचे यामुळेच तब्बल पंचेचाळीस भारतीय भाषेत व बोली भाषेत उत्स्फूर्त अनुवाद संपन्न झाले आहेत.सेवाभावी सामाजिक संस्था आणि सुधारकांनी गेल्या पंधरा वर्षात या कवितेचे अदमासे एक लाख पोस्टर प्रकाशित केलेत. यापूर्वी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ पुणे यांनी युवकभारतीच्या पाठ्यपुस्तकात सन २०१६ साली या कवितेला इयत्ता अकरावीकरिता समाविष्ट केले होते. तर गुजरात राज्यात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये ‘गुजरात माध्यमिक आणि उच्चस्तर माध्यमिक शिक्षण बोर्ड गांधीनगर यांनी इयत्ता – १२ वी विज्ञान या बोर्डाच्या प्रश्न पत्रिकेत ‘आई, मला जन्म घेऊ दे’ ही संपूर्ण कविता प्रदर्शित करीत त्यावर विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यात आले. परराज्यात खान्देशाच्या मराठी भाषिक कवीचे आणि कवितेचे यश निश्चितच उल्लेखनीय आहे.हे यश येथवरच थांबले नाही तर या कवितेवर प्रा. आत्माराम चिमकर एरंडोल, उच्च माध्यमिक शिक्षक चोपडेकर यांनी शोधनिबंधही सादर केले आहेत. जनसंवादी होणाऱ्या या कवितेला वेगवेगळ्या वर्गासाठी अभ्यासक्रमात मिळालेले स्थान पाहता कवी प्रा. वा. ना. आंधळे यांचे मानवतावादी विचारवन्त तथा जेष्ठ संशोधक प्रोफेसर डॉ. म. सु. पगारे, डॉ. दीपक खरात, प्रा. महेश सूर्यवंशी, प्राचार्य डॉ. अनिल लोहार, कवी ज्ञानेश्वर घुले,जेष्ठ कवी भगवान भटकर कवी निंबा पुना बडगुजर, कवी पी. जी. चौधरी सर, कवी विलास मोरे, रावसाहेब अरुण माळी, गणेश कुलकर्णी,प्रा. डॉ. बी. एफ. शेख यांचेसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या