- *रिंगणगावात महसूल विभागाची अवैध वाळू माफियांवर धडक कारवाई ‘,वाळूने भरलेला हायवा जप्त……..!*
एरंडोल प्रतिनिधी – तालुक्यात अवैध गौण खनिज माफियांविरोधात महसूल प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. तहसीलदार गोपाळ पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ५ मे २०२६ रोजी भल्या पहाटे रिंगणगाव शिवारात धाड टाकून अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा ट्रक रंगेहात पकडला. तहसीलदार गोपाळ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एरंडोल महसूल पथकाने सदर धडक कारवाई केली.
रिंगणगाव परिसरात वाळूची अवैध वाहतूक होणार असल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली होती.त्यानुसार सापळा रचून हायवा अडवला असता चालकाकडे वाहतुकीचा कोणताही अधिकृत परवाना मिळून आला नाही.महसूल पथकाने वाहन ताब्यात घेऊन एरंडोल तहसील कार्यालयात जमा केले आहे.
या धडक मोहिमेतील पथकात नायब तहसीलदार संजय घुले, मंडळ अधिकारी भरत पारधी, ग्राम महसूल अधिकारी वैभव पाठे,श्रीकांत कासुंदे, वीरेंद्र पालवे, संदीप पाटील, रविराज पाटील, पार्थ यादव, मयुर कुळकर्णी यांचा समावेश होता.
अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्यांची गय केली जाणार नाही.यापुढेही तालुक्यात अशीच धडक मोहीम सुरू राहील.असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
*रिंगणगावात महसूल विभागाची अवैध वाळू माफियांवर धडक कारवाई ‘,वाळूने भरलेला हायवा जप्त……..!*
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
*भारतीय जनता पार्टी तर्फे एरंडोल पोलीस स्टेशनला निवेदन*
June 22, 2026
7:40 pm
*एरंडोल येथे ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार……….!*
June 21, 2026
8:26 am
*आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एरंडोल येथे सामूहिक योगाभ्यास कार्यक्रम*
June 20, 2026
1:27 pm

