Home » क्राईम » *लहान मुलांसह पालकांना उसतोडीचे व शेतीचे काम करण्यास भाग पाडल्या प्रकरणी ठेकेदाराविरूध्द एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल…….!*

*लहान मुलांसह पालकांना उसतोडीचे व शेतीचे काम करण्यास भाग पाडल्या प्रकरणी ठेकेदाराविरूध्द एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल…….!*

  1. *लहान मुलांसह पालकांना उसतोडीचे व शेतीचे काम करण्यास भाग पाडल्या प्रकरणी ठेकेदाराविरूध्द एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल…….!*


    एरंडोल प्रतिनिधी – आदिवासी मजूर कुटुंबाला त्यांच्या लहान मुलांसह ऊसतोडीचे व शेतीचे काम करण्यास सक्ती केली म्हणून गोरेलाल रामसिंग बारेला,वय ३० वर्षे रा.नेपानगर,याने एरंडोल पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून खडके बु.,ता.एरंडोल येथील ठेकेदार व त्याचा मुलगा या पितापुत्रांविरूध्द एरंडोल पोलीस स्टेशनला गुरूवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.यामुळे खडके बु.येथील ठेकेदार रंजीत पवार व त्याचा मुलगा राजेश पवार या पितापुत्र जोडीने किशोरवयीन मुलांकडून काम करून घेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
    सप्टेंबर २०२५ पासून ते आतापर्यंतच्या कालखंडात गोरेलाल रामसिंग बारेला ( फिर्यादी) व त्याचा परिवार तसेच सोबतचे मजूर यांना खडके बु.ता.एरंडोल येथे व भरूच गुजरात येथे ६ महिने जेवणाची सुविधा व मजूरीचे पैसे न देता त्यांचे मोबाईल फोन काढून घेऊन त्यांना उपाशी पोटी ठेवून धमकी देत लहान मुलांसह त्यांच्याकडून ऊस तोडणीचे व शेतीची कामे सक्तीने करण्यास भाग पाडले.तसेच काम न केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली.
    खडके बु.येथील ठेकेदार रंजीत पवार व त्याचा मुलगा राजेश पवार यांच्या विरुद्ध एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यात आला.पुढील तपास अमळनेरचे उपविभागीय अधिकारी विनायक कोते हे पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HUF Registration Services In India
मनोरंजन
संबंधित बातम्या