-
*रिंगणगांव येथे सुती दोरीने गळफास घेऊन एकाची आत्महत्या ……!*
एरंडोल प्रतिनिधी – तालुक्यातील रिंगणगांव येथील योगेश शंकर हटकर,वय ३५ वर्षे या इसमाने त्याच्या राहत्या घराच्या लाकडी दरवाज्याजवळ असलेल्या लाकडी फटीमध्ये सुताची दोरी टाकून ती स्वतःच्या गळ्यात अडकवून गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.ही घटना १६ मार्च २०२५ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रिंगणगांव,ता.एरंडोल येथील दगडू निंबा हटकर यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला खबर दिली की दुपारी ३ वाजेच्या सुमारास योगेश शंकर हटकर याने त्याच्या राहत्या घरात घराच्या लाकडी दरवाज्याजवळ असलेल्या लाकडी फटीला सुताची दोरी टाकून गळ्यात अडकवून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार लक्षात आला.आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही.सदर घटनेची पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या आदेशानुसार पोलीस नाईक दत्तात्रय ठाकरे हे पुढील तपास करीत आहेत.
*रिंगणगांव येथे सुती दोरीने गळफास घेऊन एकाची आत्महत्या ……!*
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
*भारतीय जनता पार्टी तर्फे एरंडोल पोलीस स्टेशनला निवेदन*
June 22, 2026
7:40 pm
*एरंडोल येथे ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार……….!*
June 21, 2026
8:26 am
*आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एरंडोल येथे सामूहिक योगाभ्यास कार्यक्रम*
June 20, 2026
1:27 pm
*कवी मनोहर आंधळे यांच्या कवितेचा इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकात समावेश.*
June 13, 2026
3:21 pm
