-
*शास्त्री फार्मसीत अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना भावनिक निरोप तसेच यश मिळाल्यावर आई बाबांना विसरू नका असा मोलाचा सल्ला डॉ.शास्त्री यांनी दिला*

एरंडोल प्रतिनिधी – शास्त्री फाउंडेशन संचलित शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, पळासदळ, एरंडोल मध्ये दिनांक 23 मे 2025 रोजी औषध निर्माण शास्त्राच्या पदवी व पदवीका अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना मोठ्या जल्लोषात निरोप देण्यात आला. प्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य तथा संस्थापक अध्यक्ष डॉ. विजय शास्त्री सचिव सौ. रूपा शास्त्री तसेच उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती व धन्वंतरी पूजनाने करण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय शास्त्री तसेच सचिव सौ रूपा शास्त्री यांच्या हस्ते करण्यात आला. त्या नंतर विद्यार्थी प्रतिनिधी मधून काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. रुपेश पाटील, प्राची बागुल, नकुल सोनवणे, प्रथमेश मोने व संकेत ठोसर या विद्यार्थ्यांनी आपापले महाविद्यालयातील अनुभव आपल्या मनोगतात सांगितले. प्रसंग खूप भावनिक होता. कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. पराग कुलकर्णी यांनी केली. प्रा. मंगेश पाटील, प्रा. महेश पाटील, प्रा. करण पावरा व प्रा. अनिता वळवी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय शास्त्री यांनी जिद्द, चिकाटी आणि विश्वास यांच्या जोरावर महाविद्यालयातील सर्वच विद्यार्थी उत्तुंग असं यश गाठतील असा मोलाचा संदेश यावेळी दिला. यश मिळवताना चुकून कधी अपयश मिळाल्यास त्यासाठी सुद्धा आपली मानसिक तयारी ठेवावी असे डॉ. शास्त्री नी प्रतिपादित केले. त्याशिवाय कितीही मोठं यश मिळाल्यावर आपल्या आई बाबांना विसरू नका असे भावनिक आव्हाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. योगेश्वरी लोहार यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. मंगेश पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.
शास्त्री फार्मसीत अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना भावनिक निरोप तसेच यश मिळाल्यावर आई बाबांना विसरू नका असा मोलाचा सल्ला डॉ.शास्त्री यांनी दिला*
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
*भारतीय जनता पार्टी तर्फे एरंडोल पोलीस स्टेशनला निवेदन*
June 22, 2026
7:40 pm
*एरंडोल येथे ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार……….!*
June 21, 2026
8:26 am
*आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एरंडोल येथे सामूहिक योगाभ्यास कार्यक्रम*
June 20, 2026
1:27 pm
*कवी मनोहर आंधळे यांच्या कवितेचा इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकात समावेश.*
June 13, 2026
3:21 pm
