- *सरकारी शिव रस्त्यावर अतिक्रमण करून बेकायदेशीर रित्या नाला तयार करून शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या इसमाची तहसीलदारांकडे तक्रार…!*
एरंडोल – तालुक्यातील मौजे नांदखुर्द बु. व फरकांडे या दोन्ही गावांना जोडणारा सरकारी शिव रस्ता आहे. विजय रामकृष्ण पाटील यांच्या गट नंबर २०१ ला लागून जवळपास १०० वर्षांपूर्वीचा साधारण ४ ते ५ किलोमीटर लांबीचा नैसर्गिक नाला आहे. विजय रामकृष्ण पाटील रा.फरकांडे यांनी त्यांच्या शेताला लागून असलेला पुरातन वहिवाटी नाला बुजून सरकारी शिव रस्ता जवळपास दीडशे ते दोनशे फूट व वीस फूट खोल खोदून कोणत्याही प्रकारची शासनाची परवानगी न घेता नाल्याची माती अर्जुन गोपीनाथ झेंडे यांच्या मालकीच्या पोकलॅंडच्या साह्याने स्वतःच्या शेतात टाकून घेतली. तसेच वापर वहिवाटीस अडथळा निर्माण होईल व पावसाळ्यात अपघात होऊन जिवीतास धोका निर्माण होईल अशा प्रकारे कृत्य केले आहे.
नाल्यावरील सदरील खोदकाम सुरू असताना गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या वतीने सदर इसमास नाल्यावरील खोदकाम बंद करण्याची विनंती केली.परंतु सदर इसम हा आडदांड व भांडखोर स्वभावाचा असल्याने आपल्या आडमुठेपणाने त्याने सदरचे खोदकाम करून अनेक शेतकऱ्यांना अडचणीत आणले आहे
याबाबतीत एरंडोल तहसीलदार प्रदीप पाटील यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केलेला आहे. सदर इसमाच्या या बेकायदेशीरपणे नाला खोदकाम बाबत योग्य ती चौकशी होऊन कारवाई व्हावी. तसेच नवीन खोदकाम केलेल्या नाला बुजविण्यात यावा. त्यामुळे शेतकऱ्यांची वापर वहिवाटीची समस्या दूर होईल व शेतकऱ्यांची जिवीत हानी टळू शकेल.सदर इसमाला कायद्याचे भान नसल्याने केलेल्या प्रकारावर तात्काळ निर्बंध घालण्यात यावा. अशी मागणी माजी सरपंच रोहिदास पाटील यांनी केलेली आहे.
*सरकारी शिव रस्त्यावर अतिक्रमण करून बेकायदेशीर रित्या नाला तयार करून शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या इसमाची तहसीलदारांकडे तक्रार…!*
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
*भारतीय जनता पार्टी तर्फे एरंडोल पोलीस स्टेशनला निवेदन*
June 22, 2026
7:40 pm
*एरंडोल येथे ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार……….!*
June 21, 2026
8:26 am
*आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एरंडोल येथे सामूहिक योगाभ्यास कार्यक्रम*
June 20, 2026
1:27 pm

